पुणे प्रतिनिधी
पुणे दि. २६ : काही दिवसांपूर्वी विमानतळ परिसरात वाहन चोरीच्या घटना वारंवार होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनात होते. कोम्बिंग ऑपरेशन (दि.२५) दरम्यान संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. योगेश संजय गालीकर (वय २७ रा. विजय नगर, चौधरी पार्क,दत्तनगर दिघी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
सदर वाहन चोरीच्या पाश्वभूमीवर विमानतळ पोलीस स्थानकातील प्रभारी अधिकारी विलास सोंडे यांनी तपास पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने लोहगाव परिसरात गस्त घालत असताना पोलिसांनी आरोपीची चौकशी केली. सदरची हिरो होंडा गाडी ही सिग्नेचर हॉटेल, विमान नगर येथून चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. अधिक तपासात विमानतळ पोलीस स्थानकाच्या हद्दीतून ४ दुचाकी, व दिघी (पिंपरी चिंचवड) येथून १ गाडी चोरी केल्याचे समोर आले आहे. आरोपीकडून अडीच लाख रुपये किंमतीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे. या पूर्वीही आरोपीवर सुरत (गुजरात) येथे गुन्हा दाखल आहे.
सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, पोलीस उप आयुक्त परी-४ शशिकांत बोराटे, सह पोलीस आयुक्त संजय पाटील,यांच्या आदेशान्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे, यांच्या मार्गदर्शन खाली पोलीस निरीक्षक विजय चंदन, पोलीस उप निरीक्षक रवींद्र ढावरे, पोलीस अंमलदार अविनाश शेवाळे, अंकुश जोगदंड, नाना कर्वे,दादासाहेब बेर्डे, योगेश थोपटे, रुपेश पिसाळ,सचिन जाधव,सचिन कदम, ज्ञानेश्वरी आवारी सचिन जगदाळे,यांच्या पथकाने केली आहे.
पर राज्यातील वाहन चोरट्यास केले गजाआड












