
शुक्रवारी (दि ७) रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १ चे अधिकारी व स्टाफ वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. यावेळी पोलीस अंमलदार पांडुरंग पवार व सचिन माळवे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, ओम साई पान शॉप कर्वेनगर गल्ली नंबर ८ च्या समोर परराज्यातील इसम हा त्याच्या ओम साई पान शॉप मधून परिचित लोकांना गांजा, बंटा हे अंमली पदार्थ विकत आहे.
त्यानुसार अधिकारी व स्टाफने सदर ठिकाणी सापळा रचुन कर्वेनगर गल्ली नंबर ८ समोर कॅनोल रोड येथील ओम साई पान शॉप या पान टपरी मध्ये छापा टाकला. रामबाबु देवनारायन महतो (वय ३१ वर्षे, कर्वेनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या पान टपरीत एकुण ११० ग्रॅम गांजा, ०३ किलो ५१५ ग्रॅम बंटा मोबाईल फोन असा एकूण ४७ हजार रुपयांचा ऐवज व अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपी विरुध्द वारजे माळवाडी पो स्टे येथे गु र नं २७९ / २०२३ एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८(क), २०(ब), ii (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबाबत पोलीस अंमलदार सचिन माळवे यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे श्री. अमोल झेंडे, मा. सहा पो आयुक्त, गुन्हे १ श्री सुनिल तांबे, यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड, सहा पोलीस निरीक्षक, शैलजा जानकर, पोलीस अंमलदार मारुती पारधी, प्रविण उत्तेकर, विशाल दळवी, पांडुरंग पवार, संदिप शिर्के, राहुल जोशी, सचिन माळवे, सुजित वाडेकर, ज्ञानेश्वर घोरपडे, नितेश जाधव, रेहाना शेख, संदेश काकडे, योगेश मोहिते, यांनी केली आहे.












