पिंपरी : पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा लोकहितवादी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येत आहे. आज चार जुलै रोजी दुपारी साडे तीन वाजता या समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मा. आमदार श्री श्रीकांत भारतीय यांची प्रमुख उपस्थिती आहे.
यावेळी मा. जितेंद्र वाघ अति. आयुक्त पिंपरी चिंचवड महापालिका, मा. राजेंद्र निकाळजे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एमआयडीसी पोलीस स्टेशन भोसरी व ज्येष्ठ साहित्यिक मा. वी. रा. मिश्रा यांचा लोकहितवादी पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने आयोजित लोकहितवादी पुरस्कार वितरण समारंभ संपल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार तसेच भारतीय जनता पक्षाचे महासचिव श्रीकांत भारतीय यांचे बरोबर सध्याच्या राजकीय घडामोडीवर वार्तालापाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.












