अहिल्यादेवी होळकर ह्या उत्तम महिला प्रशासक होत्या, तसेच त्या मुत्सद्दी आणि सुधारणावादी राज्यकर्त्यां होत्या, कमी वयात राज्याची मोठी जबाबदारी पडली तरी त्यांनी डगमगून न जाता धैर्याने अनेक वर्षे राज्यकारभार केला. अहिल्यादेवी होळकर यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयात साजरी करण्यात येते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मनपा भवनातील त्यांच्या प्रतिमेस तसेच मोरवाडी चौकातील त्यांच्या पुतळ्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी पद्मश्री गिरीश प्रभुणे, आमदार उमा खापरे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उपायुक्तः रविकिरण घोडके, सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे, आण्णा बोदडे, माजी नगरसेवक मारुती भापकर, राजू दुर्गे, माजी नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता बिजय भोजने, बापू गायकवाड, उप अभियंता बाळासाहेब शेटे, संध्या बाप, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे मनोज माछरे, उमेश बांदल, नितीन समगीर, चारुशीला जोशी, सामाजिक कार्यकर्ते दिपक भोजने, संजय कवितके, रोहिदास पोटे, संजय शेंडगे, अच्युत लेंगरे, संजय नाईकवडे, दिलीप कवितके, विठ्ठल कवितके, जनसंपर्क विभागाचे वासिम कुरेशी, श्रेयश जाधव, मनपा कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
तसेच सांगवी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, क्षेत्रीय अधिकारी उमेश ढाकणे, माजी नगरसेवक संतोष कांबळे, हर्शल डोरे, माजी नगरसेविका आशा धायगुडे- शेंडगे, शारदा सोनावणे, जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. तृप्ती सांगळे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल पुराणिक,सहाय्यक आरोग्य अधिकारी बाबासाहेब कांबळे, सामाजिक कार्यकर्ते अजय विरु दुधभाते, सूर्यकांत गोफणे, जवाहर डोरे, हिरेन सोनावणे, अभिमन्यू गाडेकर, मनोजकुमार मारकड, सुधाकर सूर्यवंशी, मारुती भोलेकर, नवनाथ भिड़े, विलास पाटील, विजयकुमार हारनीळ, नारायण भुरे, गोरेकाका, बळीराम घोडके, ज्ञानेश्वर भगत, कृष्णराव गिरगुणे, मेजर संभाजी गोफणे, माणिकराव देवकाते, विनायक पिंगळे, टेकाळेकाका आदि उपस्थित होते












