पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन व ईशा नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमानाने दि.४ ऑक्टोंबर रोजी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर नेहरूनगर कोर्टातील बार रूम मध्ये आयोजित करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमासाठी ॲड प्रतीक जगताप, गोरख कुंभार, तसेच वकील बंधू भगिनी व बार असोसिएशनचे ऑडिटर राजेश रणपिसे, सहसचिव मंगेश नढे व सदस्य प्रशांत बचुटे, नितीन पवार व महिला सचिव प्रमिला गाडे उपस्थित होत्या.
या शिबिरामध्ये न्यायाधीश, वकील बंधू भगिनी व न्यायालयीन कर्मचारी मिळून 120 जणांचा सहभाग घेऊन डोळे तपासणी केली.
यावेळी संबंधित नेत्र तपासणी करणारे सबसलेहा व त्यांचे सहकारी यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे संयोजन उपाध्यक्ष ॲड. जयश्री विलास कुटे यांनी केले.












