पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०१ : आज सकाळी पुणे – नगर रोड वर २ पीएमपीएमएल बस ची जनक बाबा दर्गा जवळ समोरासमोर धडक होऊन २९ प्रवाशी जखमी झाले.
आम आदमी पार्टी च्या वतीने गेल्या काही महिन्यांपासून पीएमपीएमएल सुधारणा मोहिम सुरू केली आहे. त्यामध्ये देखील प्रवाशांच्या सुरक्षेबाबत अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत जसे की बस मध्ये प्रथोमपचार पेटी असणे, आग विझवण्यासाठी आग क्षमन यंत्र, काच फोडण्यासाठी हातोडा, इ. असणे खूप गरजेचे आहे अणि ते बस मध्ये असले पाहिजे हे पीएमपीएमएल प्रशासनाला वारंवार सांगितले आहे.
या अपघाता दरम्यान या सुविधा गाडी मध्ये असत्या तर जखमींना उपचारासाठी मदत झाली असती व अपघाताची तीव्रता कमी झाली असती.
बस तपासणीसाठी मुख्य यादी:
1) प्रथमोपचार किट
2) आपत्कालीन बाहेर पडण्यासाठी हातोडा
3) उभ्या प्रवाशांसाठी परिस्थिती हाताळते
4) अग्निशामक यंत्र
५) बसमधील तक्रार क्रमांक
6) बसच्या आत बस क्रमांक
7) स्पीडोमीटर कार्यरत आहे की नाही
8) कॅमेरा कार्यरत आहे की नाही
9) मागील दृश्य मिरर
10) आसन स्थिती
11) दारे व्यवस्थित उघडणे
12) गियर लीव्हर योग्यरित्या कार्य करत आहे
13) काम करत आहे की नाही हे दाखवा
14) दिवे कार्यरत आहेत की नाही
15) हेडलॅम्प आणि टेल लॅम्प कार्यरत आहेत की नाही
16) पावसात बस गळती
असे अपघात भविष्यामध्ये होऊ नये म्हणून अपघाताची सखोल चौकशी व्हावी व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी आम आदमी पार्टी पुणे सार्वजनिक वाहतूक विभागाकडून मागणी करण्यात आली आहे.












