पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २६ : तरुणांमध्ये सध्या अंमली पदार्थां विषयी भलतीच क्रेझ आहे.यामुळे ही मुले अगदी लहान वयात नको त्या मार्गाला जात असल्याचे चित्र आपल्याला दिसते.हे चित्र बदलण्यासाठी तरुणांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे.या अनुषंगाने शासनाच्या उपक्रमाअंतर्गत पुणे शहर पोलिस दलाने रन फॉर डि – ॲडिक्शन अँड रन फॉर वुमन सेफ्टी या महा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे.
पुणे पोलिस आणि नागरिकां करीता ब्ल्यू ब्रिगेड रनिंग क्लब यांच्या तर्फे या महा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून याकरिता पंचशील ग्रुप व पूनित बालन ग्रुप यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.
ही महा मॅरेथॉन स्पर्धा दिनांक ०६ रोजी सकाळी ०५:३० वाजता वेस्टीन हॉटेल, एबीसी रोड,कोरेगाव पार्क,मुंढवा या मार्गाने सुरू होत हडपसर मगरपट्टा सिटी येथून पुन्हा वेस्टीन हॉटेल येथे येऊन संपन्न होणार आहे.
या स्पर्धेसाठी सहभागी होणाऱ्या स्पर्धकांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे.https:// www. townscript. com/e/pune-police-run-10k-243042 या ऑनलाईन लिंक द्वारे रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे.सदरचे रजिस्ट्रेशन सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे.या महा मॅरेथॉन मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना मोफत टी – शर्ट,मेडल आणि नाश्त्याचे वाटप करण्यात येणार आहे.
या महा मॅरेथॉन स्पर्धेत पोलिस आणि नागरिक असे मिळून ७०० स्पर्धक सहभागी होऊ शकतात.त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर आपला सहभाग निश्चित करावा.












