पुणे 12 जुलै 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑगस्ट रोजी पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या विस्तारित मार्गांचे उद्घाटन करण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी ट्विटर पोस्टद्वारे पंतप्रधान मेट्रो मार्गांचे उद्घाटन करण्याच्या शक्यतेचा तपशील शेअर केला आहे.
“सीएमआरएस ची तांत्रिक मान्यता लवकरच अपेक्षित आहे. मंजुरी मिळाल्यानंतर फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट आणि गरवारे कॉलेज ते रुबी हॉल क्लिनिक स्टेशन दरम्यानच्या नवीन पुणे मेट्रो कॉरिडॉरचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 1 ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यात होणार आहे,” त्यांनी ट्विट केले.
या वर्षीचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधानांना जाहीर झाला असून हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते 1 ऑगस्ट रोजी पुण्यात येण्याची शक्यता आहे.
पुणे मेट्रोच्या दोन नवीन विस्तारित मार्गांचे पंतप्रदान यांच्या हस्ते उदघाटन












