पुणे | महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण-2010 अंतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 15 व 16 नोव्हेंबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह, घोलेरोड, शिवाजीनगर, येथे ग्रंथोत्सव- 2022 चे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्ताने ग्रंथ प्रदर्शन, विक्री आणि त्यासोबतच विविध साहित्यिक व सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथोत्सवाचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते होणार असून उदगीर येथे झालेल्या 95 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील.












