
पुणे |प्रतिनिधी
पुणे, दि. १३ : महिलेच्या मंगळसूत्रावर डल्ला मारणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांवर मकोका कारवाई करण्यात आली आहे. ही घटना वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून एका महिलेने ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली भिकाजी चव्हाण ( वय २२ वर्षे, रा. देवाची उरुळी धनगर वस्ती, मंतरवाडी, ता. हवेली, जि. पुणे ) व गजानन दत्तराव बोराडे ( वय ३० वर्षे, रा. हिवरकर मळा, सागर जगताप यांची बिल्डींग फ्लॅट नं.०२, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे ) या दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
दि. ०८ रोजी फिर्यादी ह्या वानवडी येथील कैदारी गार्डनचे गेट समोरील पार्किंग मध्ये गाडी पार्क करून गेट समोर आल्या होत्या.त्यावेळी आरोपी हे बाईकवरून तेथे येत फिर्यादी यांच्या गळ्यातील पंचवीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेत तेथून पोबारा केला आहे.
सदर गुन्ह्याचा अधिक तपास केला असता आरोपी यांच्याविरुद्ध १६ गुन्हे दाखल असुन दोन्ही आरोपींनी एकत्रित पणे एकूण ०८ गुन्हे केलेले आहेत. त्यांनी पुणे शहर आयुक्तालयाच्या हद्दीत चैन स्नॅचिंग व मंगळसूत्र चोरीचे असे गुन्हे हे एकटया महिलांना गाठुन, त्यांना धक्का देवून त्यांच्या गळयातील सोन्याच्या मंगळसुत्र आणि सोन्याच्या चैनेच्या जबरदस्तीने चोऱ्या केल्या आहेत. अशा प्रकारच्या जबरी चोऱ्यां सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत.
आरोपींवर भादवी कलम ३९२,३४ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास वानवडी विभागाचे सहा. पोलीस आयुक्त श्री. शाहुराजे साळवे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उप-आयुक्त, परीमंडळ -०५, पुणे, श्री. विक्रांत देशमुख, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग पुणे, श्री शाहुराजे साळवे यांचे मार्गर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वानवडी पोलीस स्टेशन, पुणे, श्री भाऊसाहेब पटारे, पोलीस निरीक्षक, गुन्हे, श्री. विनय पाटणकर, पोलीस उप-निरीक्षक अजय शितोळे, संतोष गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक ज्ञानदेव शेलार, पोलीस अंमलदार मनोज साळुंखे, अमोल घावटे, उत्तरेश्वर धस यांनी कारवाई केली आहे.












