पुणे प्रतिनिधी
पुणे दि ८ : मुलांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचाच मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. ही घटना लोहगाव येथील एमआयटी कॉलेज समोर दि. ७ एप्रिल रोजी घडली होती. अमित कुमार विश्वकर्मा असे मृत व्यक्तीचे नाव असून फरार असलेल्या आरोपीला चार महिम्यानंतर बीड मधून अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की एमआयटी कॉलेज समोर आरोपी शंतनु शिवरात चाटे (वय 19), दिलीप बाबुराव हांगे व दोन विधीसंघर्षित बालकांमध्ये वडगाव घेनंद रोड,आळंदी येथे भांडणे सुरू होती. फिर्यादी अमित कुमार विश्वकर्मा हे भांडणे सोडवण्यास गेले असताना, आरोपीने फिर्यादीवर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. फिर्यादी यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी विरोधात विमानतळ पोलिस स्थानकात भा.द.वि.कलम ३२६,३४१,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हातील आरोपी हा चार महिन्यांपासून फरार होता. पोलीस हवालदार संजय आढारी व नाईक विनोद महाजन यांनी दि.५ रोजी बीड मधून अटक केले आहे.
सदरची कामगिरी पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे) रामनाथ पोकळे,पोलीस उप आयुक्त गुन्हे अमोल झेंडे सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-२ सतीश गोवेकर, पोलीस निरीक्षक गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक जयदीप पाटील, पोलीस हवालदार संजय आढारी, पोलीस हवालदार प्रवीण भालचिम पोलीस नाईक विनोद महाजन यांनी केली आहे.
पोलिसांना चकवा देणारा आरोपी जेरबंद












