पोलिसांवर अरेरावी आणि त्यांच्या कामात अडथळा आणल्याच्या घटना दिसून येत आहेत. अशाच एका प्रकारची घटना बिबेवाडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार रामदास बांदल यांच्यासोबत घडली.
बिबवेवाडी पोलीस स्टेशनला मुख्य नियंत्रण कक्षा मधून नाकेबंदी करण्याचे आदेश आले होते. याच आदेशाचे सहायक फोजदार रामदास बांदल हे त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत कर्तव्य बजावत होते. आरोपी गौरव वालावकार वय 21 (रा बिबवेवाडी ) दुचाकी वरून जात असताना त्यांची दुचाकी तपासणीसाठी अडवली. त्यावेळी आरोपी “मी कोण आहे तुम्हाला दाखवतो. उद्या सासऱ्यांना घेऊन येतो मग तुम्हाला कळेल” असे म्हणाले. आरोपी यांनी एका महिलेस त्या ठिकाणी बोलावून घेतले. आरोपी महिलेने फिर्यादी सोबत वाद घालत “कशाला रस्त्यावर नाकाबंदी लावून लोकांना त्रास देता,बंद करा हे रोजचे नाटक, मी तुम्हाला दाखवते कि मी काय करू शकते” आणि फिर्यादींच्या सरकारी कामात अडथळा आणला.
याप्रकरणी बिबेवाडी पोलीस स्टेशनमध्ये भादविक 353, 332, 506, 109, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला आरोपीस अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या सरकारी कामात अडथळा करून धक्काबुक्की












