पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ३१ : केकचे दुकान बंद असताना शटर उघडून गल्ल्यातील पैसे लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून एका महिलेने ओमकार नामदेव जाधव ( वय २४, रा. शाहूनगर, चिखली ) व गणेश नामदेव श्रीगोंड ( रा .चिखली ) यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादी महिलेचे चऱ्होली फाटा येथे केकिज नावाचे केकचे दुकान आहे. त्यांनी दुकानात ठेवलेला कामगार हा दुकान बंद करून घरी गेला असता आरोपींनी दुकानाचे शटर उघडून आत मध्ये प्रवेश केला. तसेच गल्ल्यातील १,२०० चोरून नेले आहेत.
आरोपींवर भादवि कलम ३८०,४५७,३४ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून एका आरोपीला अटक करण्यात आले आहे. एका आरोपीचा शोध सुरू असून सदर घटनेचापुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिखरे हे करत आहेत.












