
पुणे: गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी गुन्हे शाखेकडून वारंवार रेकॉर्डवरील आरोपी चेकींग तसेच पेट्रोलींग करण्यात येत आहे. यासाठी श्री रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त पुणे व श्री अमोल झेंडे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे पुणे शहर यांनी गुन्हे शाखेतील सर्व अधिकारी व अंमलदार यांच्या विवीध टिम तयार करून गुन्हेगार प्रतीबंधक कारवाई करण्यासाठी तसेच नागरीकांना मनमोकळे फिरता येईल यासाठी ऑलआऊट ऑपरेशन राबविले आहे..
शनिवारी (दि०८) रोजी ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान गुन्हेगार चेकींग चालु असताना गुन्हे शाखा युनिट – १ चे पथक फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दत्तमंदिर बुधवार पेठ येथे आले होते. त्या दरम्यान पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सिंहगड रोड येथे रहाणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार ओकांर अंभुरे रा गारमाळा धायरी, पुणे हा बुधवार पेठ, येथे येणार असून त्याच्याकडे पिस्टल आहे. त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार पेठ येथे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून ६० हजार रुपयांचे एक देशी बनावटीचे पिस्टल मिळून आले. त्याबाबत फरासखाना पोलीस ठाण्यात गु र नं १२० / २३, आर्म अॅक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, पुणे शहर,श्री.संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर,श्री.अमोल झेंडे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे – १, पुणे शहर, श्री.सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-१,कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शब्बीर सैय्यद, सहा. पोलीस निरीक्षक, आशिष कवठेकर, पोलीस उप-निरीक्षक, सुनिल कुलकर्णी, अजय जाधव, पोलीस अंमलदार, दत्ता सोनवणे, राहुल मखरे अमोल पवार, शशीकांत दरेकर,विठ्ठल सांळुखे, महेश बामगुडे, अभिनव लडकत यांच्या पथकाने केली आहे.












