गाडी चालवताना हळू चालवा असे आपले प्रिय नेहमी सांगत असतात. आता आपण कितीही गाडी हळू चालवली तरी समोरील व्यक्ती कसा गाडी चालेल याचा नेम नाही. अशाच प्रकारच्या परिस्थितीमुळे लोणीकंद केसनंद रोडवर एक अपघात घडला.
एका अज्ञात वाहन चालकाने वाहतूक नियमांचं उल्लंघन कले.भरधाव जोरात वेगाने पाठीमागून येऊन फिर्यादी ओम लोणकर वय 21 राहणार वाघोली यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात फिर्यादी यांचे मित्र आनंद गजरे वय 20 राहणार वाघोली यांचा मृत्यू झाला. फिर्यादी यांचा डावा हात आणि उजवा पाय गंभीरित्या फ्रॅक्चर झाला आणि दुचाकीचे नुकसान झाले
याप्रकरणी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये भा द वि क 304 अ 279,337,338,427 मोवा का क्र 184 134/177 119/177 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
भरधाव वेगाने पाठीमागून आलेल्या वाहनाची दुचाकीला धडक












