पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०१ : पिंपरी – चिंचवड परिसरातील दोन प्रभागामध्ये अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली आहे.दि.३०ऑगस्ट २०२३ रोजी चिंचवडगाव, चाफेकर चौक, मोरया हॉस्पिटल, काळेवाडी बीआरटीएस रोड, काळेवाडी मेन रोड येथे ही अतिक्रमण कारवाई करण्यात आली.
यावेळी प्रभाग क्रमांक १८ मध्ये ४ फ्लेक्स, १ तीनचाकी सायकल, ६ प्लास्टिक कॅरेट, १ पाणी पूरी स्टॅण्ड तसेच प्रभाग क्रमांक २२ मध्ये २ फ्लेक्स, १० किऑक्स इ. साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई कामी करताना सर्व मजूर कर्मचारी व एम.एस.एफ चे जवान हजर होते.












