पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
दि.१९ : महाळुंगे रोडवर निघोजे येथे महिंद्रा कंपनीच्या आत जाणाऱ्या गेट नं २ च्या समोर एक भरधाव वेगाने जाणाऱ्या टाटा कंपनीच्या मिक्सर ट्रकने (क्र. एम एच १४ एच यु ९३६५) महाळुंगे बाजूकडून तळवडे कडे जात असताना एका स्टॉरक् मोटारसायकल (क्र. एम एच १४ के आर ६६९२) ला धडक दिली असता मोटरसायकल चालक ज्ञानेश्वर गणेश मते यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला व ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला.
या संदर्भात शुभम नारायण गावडे वय २७ रा. तळवडे यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून आपल्यामुळे कोणाच्यातरी जीवितास धोका उद्भवू शकतो याची जाणीव असतानाही जाणीवपूर्वक भरधाव वेगात वाहन चालवल्यामुळे व अपघात करून एका इस्मास ठार मारल्याकारणाने पोलिसांनी ट्रक चालक गोविंद राजेश बेलसरे वय २५ रा. खेड याला ताब्यात घेत त्याच्यावर भा. द. वि. कलम २७९, ३०४(२), मो.वा. का. कलम १८४,१३४(अ)(ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महाळुंगे एमआयडीसी पोलीस करत आहे.












