पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १२ : शिवाजीनगर वाहतूक विभागा अंतर्गत सिमला चौक ते वीर चाफेकर चौक येथे मेट्रोच्या पिलर उभारणीचे काम चालू करण्यात येणार आहे.त्यासाठी वाहतुकीची एक लेन पूर्णपणे बंद करावी लागणार आहे.
परिसरात वाहतूक सुरळीत राहावी यासाठी शिवाजीनगर वाहतूक विभागातील वाहतूक आणि पार्किंग मध्ये बदल करण्यासाठी मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६ (१) (ए) (बी). ११६( ४ ) आणि ११७ च्या अंतर्गत विजय कुमार मगर [ पोलीस उप आयुक्त, वाहतूक, पुणे शहर ] यांनी शिवाजीनगर वाहतूक विभागा तर्फे परिसरातील वाहतुकी मध्ये तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्याचे आदेश दिले आहेत.
गणेश खिंड रोड तसेच न.ता वाडीकडून येणारा रस्ता व फर्ग्युसन कॉलेज वरून शिवाजीनगर मुख्यालयाकडे जाणारा रस्ता येथील वाहतूक बंद करण्यात आली असून ती सिमला ऑफिस चौकातून यू – टर्न घेऊन पोलीस मुख्यालय गेट कडून वळवण्यात आली आहे.
गणेश खिंड रोडवरील सिमला ऑफिस चौक ते वीर चाफेकर चौक,तसेच वीर चाफेकर चौक ते सिमला ऑफिस चौक या दोन्ही रस्त्यावरील वाहतूक सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात आली आहे.












