पुणे | प्रतिनिधी
पुणे दि.०४ : सध्याच्या दंगलीच्या, गोंधळाच्या,आणि निव्वळ पोकळ घोषणांच्या किळसवाण्या राजकीय परिस्थितीत सर्वच क्षेत्रात हे सरकार अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसत आहे त्यात अत्यंत महत्वाचे क्षेत्र म्हणजे क्रीडाक्षेत्र.
दररोज नियमितपणे सकाळ,संध्याकाळ, तासनतास शेतात, डोंगरमाथ्यावर,रस्त्यावर,विविध मैदानांवर,तसेच आपापल्या प्रशिक्षण वर्गांवर आजचा अल्पवयीन व तरुण ,तरुणी कराटे , तायकोंदो या कलेचा सराव करताना दिसत आहे. कारण शालेय विविध क्रीडा स्पर्धा या सुरू झालेल्या आहेत.आणि या शालेय क्रीडा स्पर्धेत यशस्वी होऊन जीवनाचे धेय्य निश्चितपणे मिळणार या अपेक्षेने प्रत्येक कराटे व तायकोंदो पटू शालेय स्पर्धेत या क्रीडा प्रकारचा कधी समावेश होणार ? याकडे डोळे लाऊन बसला आहे.
परंतु सरकारला व क्रीडा संचालनालय महाराष्ट्र राज्य,पुणे..यांना समक्ष भेटून ,अनेकवेळा पत्रे, निवेदने देऊनही सरकार काही उत्तर व निर्णय घ्यायला तयार नाही असे वाटते…यामुळे या दोन्ही क्रीडा क्षेत्रातील क्रीडापटूचे भवितव्य नक्कीच धोक्यात आल्याचे दिसून येते.
यातून हे निश्चितपणे जाणवते की सरकारला या अत्यंत महत्वाच्या व अलौकिक अशा कराटे, तायकोंदो या क्रीडापटूचे काही देणेघेणे नाही आणि यामुळेच सरकारचे क्रीडा क्षेत्राकडे पूर्णतः दुर्लक्ष जाणवते.ज्याचा आम्ही क्रीडा समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतिने तीव्र निषेध व्यक्त करतो तसेच दोन/ तीन दिवसात या विषयावर निर्णय न झाल्यास सरकार व क्रीडा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या म्हाळुंगे येथील कार्यालय समोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची सरकारने व क्रीडा संचालनालयाने नोंद घ्यावी.












