पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २० : रोटरी क्लब युवाच्या निर्माल्य खत प्रकल्पाचे उद्घाटन मा.आ.मेधाताई कुलकर्णी व रोटरी प्रांत ३१३१ च्या प्रांतपाल मंजू फडके यांच्या हस्ते संपन्न झाले.
डीपी रस्ता येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी मा.आ.मेधाताई कुलकर्णी,प्रांतपाल मंजू फडके, रोटरी क्लब युवाचे अध्यक्ष निनाद जोग, माजी नगरसेवक जयंत भावे, मनपा सहाय्यक आयुक्त राजेश गुरम, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक गणेश खिरीड, आरोग्य निरीक्षक वैभव घटकांबळे आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना मेधाताई कुलकर्णी यांनी या समाजोपयोगी प्रकल्पाचे सातत्य हि कौतुकास्पद बाब असल्याचे प्रतिपादन केले.मंजू फडके यांनी पर्यावरणास अशा प्रकल्पाने सहाय्य होवून प्रदूषण कमी होण्यास मदत होते असे सांगितले. निनाद जोग यांनी प्रकल्पाचे सातवे वर्ष असून याद्वारे निर्माल्याचे श्रेडींग व प्रक्रिया करून खत तयार होते व ते मोफत वाटप होते.२० ते २५ टन निर्माल्यावर प्रक्रिया होईल असे नमूद केले.












