पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २३ : आजही वडापाव म्हणलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं वडपावला नाही म्हणणारा आपल्याला क्वचितच सापडेल.खासकरून मुंबईत आपली उपजीविका भागवण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकासाठी वडापाव हेच दिवसभराचं खाणं असतो. आज जागतिक वडापाव दिवस आजच्या दिवशी वडापावची खरी संकल्पना उदयास आली.
या जगप्रसिद्ध वडापावची सुरवात १९६६ मध्ये मुंबईमधील दादर स्टेशन बाहेरील अशोक वैद्य यांच्या हातगाडी पासून झाली. त्यांच्या नंतर दादर मधील सुधाकर म्हात्रे यांनी देखील वडापावची सुरुवात केली. फक्त बटाट्याची भाजी आणि चपाती खाण्याऐवजी भाजीचा गोळा बेसनात घोळवून खाल्ल्यास अधिक स्वादिष्ट लागतो हे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी वडापाव ची सुरुवात केली. मुंबईतील अनेक ठिकाणी वडापाव हा सुप्रसिद्ध झाला. दादर, लालबाग परेल आणि गिरगाव येथील कामगारां मुळे वडापाव जास्त प्रसिद्ध झाला आहे.
1970 ते 1980 च्या काळात मुंबई मधील गिरण्या बंद झाल्या आणि तेथील अनेक कामगारांनी रोजगाराचे साधन म्हणून वडापाव ची दुकाने सुरू केली.आता अनेक ठिकाणी पोट भरण्याचे जलद साधन म्हणून वडापाव कडे पाहिले जाते.












