पिंपरी(प्रतिनिधी)
मुंबईस्थित अर्थसंकेत संस्थेच्या वतीने सनदी लेखापाल वैभव मोदी यांना महाराष्ट्र बिझनेस ॲचिव्हर्स ॲवार्ड देवून सन्मानित करण्यात आले.
बाणेर येथे निकमार युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ अनिल कश्यप, अर्थसंकेतचे संचालक अमित बागवे, रचना बागवे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. सीए मोदी हे सीए विद्यार्थी असोसिएशन पिंपरी चिंचवड शाखेत ते अध्यक्ष आहेत.
सीए मोदी हे रेरा विषयाचे गाढे अभ्यासक आहेत. पुणे, मुंबई, नाशिक पिंपरी चिंचवड शहरातील हजाराहून अधिक बांधकाम प्रकल्पासाठी ते रेरा सल्लागार म्हणून कार्य करीत आहेत. मोदी हे सर्वसामान्य घरातील, खडतर परिस्थितीशी संघर्ष करीत कमी वयात सीए बनले आहेत. गेली १४ वर्षापासून ते सीए म्हणून कार्यरत आहे. शाळा महाविद्यालयामध्ये अनेक तरुणांना करियर विषयक मार्गदर्शन करीत आहेत.












