पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २१ : दरोडा,जबरी चोरी व चैन चोरी सारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या चार जणांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही घटना हडपसर पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
याप्रकरणी अमोल भास्कर शेलार ( वय २५, रा. नेवासा फाटा, अहमदनगर ), स्वप्नील उर्फ भावड्या ईश्वर केंदळे ( वय २९, रा. नेवासा,अहमदनगर ), अमर चिल्लू कांबळे ( वय ३५, रा.नेवासा, अहमदनगर ), विजय रामकृष्ण देडगावकर ( वय ६३, रा. कोल्हार, अहमदनगर ) यांच्याविरुद्ध एका महिलेने फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादी ह्या दि. २० रोजी मॉर्निंग वॉक वरून घराच्या समोरील पार्किंग मध्ये आल्या होत्या त्यावेळी आरोपी हे दुचाकीवरून पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या जवळ आले.पत्ता विचारत असताना त्यांच्या गळ्यातील सोन्याची मनीमाळ जबरदस्तीने हिसकावून पोबारा केला.
आरोपींविरुद्ध भादवी कलम ३९२,३४ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास अश्विनी राख – केदार सह पोलिस आयुक्त ( हडपसर विभाग ) ह्या करत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उप-आयुक्त परीमंडळ-५ पुणे शहर श्री. विक्रांत देशमुख, मा. सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे शहर श्रीमती अश्विनी राख-केदार यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर श्री. रविंद्र शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे पोलीस निरीक्षक (गुन्हे), शिवले, सहा. पो. निरीक्षक विजयकुमार शिंदे, सहा. पो. निरीक्षक दिपक बर्गे, पोलीस उप-निरीक्षक अविनाश शिंदे.. हडपसर तपास पथक तसेच निगराणी पथकातील पोलीस अंमलदार प्रविण शिंदे, संदिप राठोड, सचिन जाधव, निखील पदार, भगवान हंबर्डे, अनिरुध्द सोनवणे, महेश उबाळे, मपोना खैरे, राकेश चव्हाण, बाबासाहेब शिंदे वसिम शेख यांनी केली आहे.











