सध्या संशयावरून खून भांडणाच्या घटना घडत आहेत. असाच एक प्रकार पिसोळी येथे आज मंगळवारी घडला.
फिर्यादी यांची मेहुणी ही पिसोळी मध्ये आपल्या पतीसोबत राहत होती. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास इतर पुरुषांसोबत संबंध असल्याच्या संशयावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. त्यांच्या बाजूला राहणाऱ्या त्यांच्या मावशीने मध्यस्थी करून हा वाद मिटवला. पण पहाटेच्या साडेतीनच्या दरम्यान पतीने पत्नीवर चाकूने वार करून तेथून फरार झाला. गंभीरित्या जखमी झाल्यामुळे फिर्यादीच्या मेहुणीला दवाखान्यात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना पाहताच मृत घोषित केले.
याप्रकरणी कोंडवा पोलीस स्टेशनमध्ये भादविक 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस करत आहेत
संशयाने पत्नीवर चाकूने वार करून खून












