पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २९ : आज औषधाशिवाय जीवन जगणे अशक्य गोष्ट आहे व वयानुसार औषध उपचाराची वाढती गरज ही न टाळता येणारी गोष्ट आहे, हे जरी खरे असले तरी औषधांचा योग्य वापरासाठी समाज प्रबोधनाची नितांत आवश्यकता आहे असे मत डी.वाय पाटील शैक्षणिक संकुल, आकुर्डीचे संचालक रियर ऍडमिरल अमित विक्रम (निवृत्त) यांनी व्यक्त केले. ते आकुर्डी स्थित डी.वाय पाटील फार्मसी महाविद्यालयामध्ये फार्मासिस्ट दिनापासून सुरू झालेल्या “फार्मासिस्ट सप्ताहाच्या” निमित्ताने समाज प्रबोधन पर कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये बोलत होते.
यावेळी त्यांनी आपल्या देशामध्ये रुग्णांच्या संख्येच्या तुलनेने डॉक्टरांची संख्या खूपच कमी असल्याने आधुनिक फार्मसीस्टने ही जबाबदारी स्वीकारावी असे आवाहन केले.
यावेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य, औषध सेवन जागरूकता फेरी, नृत्य इत्यादी पारंपारिक उपक्रमांद्वारे समाज प्रबोधनाचे प्रात्यक्षिक सादर केले.
या यानिमित्ताने सुरू झालेले हे उपक्रम वर्षभर पुणे शहरातील विविध ठिकाणी व जवळच्या ग्रामीण क्षेत्रांमध्ये राबविणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. नीरज व्यवहारे यांनी दिली.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. आरती सोनवणे, प्रा. पल्लवी सोमठाणे, प्रा पूजा पलंदुरकर, प्रा. काजल भगत इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.












