पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि.१७ : लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सराईत गुन्हेगाराला तडीपार करण्यात आले आहे.सागर कुमार गायकवाड, (वय-३३ केसनंद) असे कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
सदर आरोपी विरोधात परिमंडळ चार चे उपायुक्त श्री.शशीकांत बोराटे यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ (१) (अ) (ब) प्रमाणे पुणे जिल्ह्यातुन ०१ वर्षाकरीता तडीपार केले आहे.
लोणीकंद परिसरातील केसनंद तसेच आसपासच्या भागात दहशत निर्माण करुन, तेथील सामान्य नागरीकांना वारंवार त्रास देणे, दहशत निर्माण करुन लोकांच्या जिवीतास धोका निर्माण करणे असे गंभीर गुन्हे आरोपीने केले आहे.
आरोपी याच्यावर दाखल गुन्ह्यांचा अभिलेख तपासुन त्यास महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ अंतर्गत पुणे जिल्ह्याच्या हद्दीतुन एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त, श्री. रंजन कुमार शर्मा, मा. पोलीस उपायुक्त,श्री.शशिकांत बोराटे, मा. सहा. पोलीस आयुक्त, श्री. संजय पाटील, तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गजानन पवार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री विश्वजित काइंगडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक, रामकृष्ण दळवी, पोलीस अंमलदार, प्रशांत कापुरे, सागर कडु यांनी केली आहे.
तडीपार करण्यात आलेला आरोपी हा पुणे जिल्ह्याच्या परिसरात आढळुन आल्यास, त्यांची माहीती लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर संपर्क क्र. ९५२७०६९१०० यावर कळविण्याचे आवाहन लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री . विश्वजित काइंगडे यांनी केले आहे.












