पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०१ : टोळीप्रमुख सागर दत्ता चांदणे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध मकोका कारवाई करण्यात आली आहे. ही घटना चतुर्शृंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
याप्रकरणी सागर दत्ता चांदणे ( वय २४ वर्ष, रा खडकी बाजार पुणे ), यश ऊर्फ मोन्या प्रविण गोपनारायण ( वय १९ वर्ष, रा खडकी बाजार पुणे ), ऋषी किरण बिवाल ( वय १९ वर्ष, रा. खडकी बाजार पुणे ), आयुष ऊर्फ बंटया नागेश लांडगे ( वय १९ वर्ष रा.खडकी बाजार, पुणे ) यांना अटक करण्यात आली असुन इतर सात आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मित्रासोबत चतुर्श्रुंगी माता मंदिर येथे तोरण अर्पण करून घरी जात होते. त्यावेळी फिर्यादी यांना आरोपींनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करून थांब तुझा मर्डर करतो असे म्हणत त्यांच्या हातातील धारदार शस्त्राने डोक्यात वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच हातातील शस्त्र हवेत फिरवून कोण मध्ये पडला तर त्याला पण मारून टाकेल अशी धमकी दिली.
आरोपींविरोधात भादवि कलम ३०७,३२३,१४१,१४३,१४४,१४७,१४८,१४९ सह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट कलम ७ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ ( १ ) ( ३ ) सह १३५ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच आरोपींवर दाखल गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३ ( १ ) ( ii ) (२) ३ (४) अंतर्गत मकोका कारवाई करण्याचे आदेश मा.अपर पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग पुणे श्री. रंजनकुमार शर्मा यांनी दिले आहेत.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, खडकी विभाग पुणे शहर श्रीमती आरती बनसोडे ह्या करीत आहेत.
ही कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. रितेश कुमार, मा. सह-पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णीक, मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उप-आयुक्त परी-४ पुणे शहर श्री. शशिकांत बोराटे, मा. सहायक पोलीस आयुक्त, श्रीमती आरती बनसोडे यांचे मार्गदशनाखाली चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे, पोलीस निरीक्षक गुन्हे, श्री अंकुश चिंतामण, श्री, जगन्नाथ जानकर, निगराणी पथकाचे सहा. पोलिस निरीक्षक रत्नदीप गायकवाड, पो. उपनिरीक्षक सचिन गाडेकर, पोलीस अमंलदार अमित गद्रे व सुहास पवार यांनी केली आहे.
मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मकोका अंतर्गत केलेली ही ७४ वी कारवाई आहे.












