सासु सुनेचा नात्याबद्दल कित्येकदा चर्चा होत असते काही सासू सून हे मैत्रिणीसारखे असतात तर काहीच एकमेकांशी पटत नाही असाच एक सासू-सुनेच्या वादाचा प्रकार शनिवारी वडगाव शेरी येथे घडला
फिर्यादी यांची सून आणि तिच्या आईने संगणमत करून चावी देण्याच्या बहाण्याने सासूच्या वडगाव शेरी मधल्या घरी गेले. घरात जबरदस्तीने घुसून शिवीगाळ करत मारहाण केली. फिर्यादी यांना धमकी देऊन कानातील सोन्याची रिंग जबरदस्तीने ओढून काढून नेली.
याप्रकरणी भादविक 392 952 323 504 506 34 अंतर्गत येरवडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत
सासु सुनेचा वादात आईची एन्ट्री












