पुणे प्रतिनिधि
पुणे दि १५ : पुण्यातील विमानतळ परिसरात शुक्रवार (दि १४) रोजी पहाटे ४ वाजता एका इसमाने अमीर रेस्टॉरंट अँड चायनीज सेंटर येथील कामगारास धारदार शस्त्राने गंभीर जखमी केले आहे. सदर घटनेची तक्रार तेथील हॉटेल कामगाराने विमानतळ पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली आहे. चेतन बसवराज चितापुरे (वय २२) रा.मोझे आळी,लोहगाव, असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अमीर रेस्टॉरंट अँड चायनीज सेंटर येथे कामाला आहे.
शुक्रवारी ते हॉटेल बंद करून फोन वर बोलत थांबले होते. इसमाने त्यांना सिगारेट मागितली असताच त्याला हॉटेल बंद आहे असे सांगितले. आरोपीने सिगारेट न दिल्यामुले याचा राग मनामध्ये धरून तू मला ओळखले नाही,थांब तुझा गेम करतो असे म्हणत फिर्यादी वर धारदार शस्त्राने वार केला असून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
आरोपीवर भादंवि कलम ३०७,५०४,५०६(२) महा.पो.का.क.३७ (१) १३५,आर्म ऍक्ट ४(२५) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन साळवी हे करत आहे.












