पिंपरी(प्रतिनिधी) निगडी येथील सी.एम.एस इंग्लिश मिडीयम हायर सेकंडरी स्कूलच्या नव्याने बांधण्यात आलेल्या अद्ययावत बॅडमिंटन कोर्टवर आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडल्या या स्पर्धेत चिंचवड मल्याळी समाजमच्या सी.एम.एस इंग्लिश मिडीयम हायर सेकंडरी स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे माजी बॅडमिंटन खेळाडू श्री.प्रदीप वेणुगोपाल कुंदाजी यांच्या विशेष उपस्थितीत खेळवल्या गेल्या. या स्पर्धेत पी.सी.एम.सी परिसरातील सुमारे 25 शाळांनी भाग घेतला श्री. प्रदीप वेणूगोपाल कुंदाजी (ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटनपटू) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी सी.एम.एस चे अध्यक्ष टी.पी.विजयन, सरचिटणीस सुधीर. सी.नायर,उपाध्यक्ष पी. श्रीनिवासन, पी.व्ही.भास्करन आणि इतर समिती सदस्य उपस्थित होते.
25 शाळांमधील सुमारे 150 स्पर्धकांनी अनुक्रमे 11,13,15 आणि 17 या विविध वयोगटांमध्ये खेळली गेली. शाळेच्या प्राचार्य डॉ. बिजी पिल्ले यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. अध्यक्ष व सरचिटणीस यांनीही उपस्थितांना संबोधित करून विद्यार्थ्यांच्या जीवनात खेळाचे महत्व विशद केले. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात म्हणाले की; शाळांनी नेहमीच क्रीडा उपक्रमांना प्रोत्साहन दिले पाहिजे जेणेकरून मुलांचे शारीरिक,मानसिक आरोग्य नेहमीच उत्तम राहील.
स्पर्धेचे विजेते. वयोगट वर्षाखालील 11 मुले प्रथम-अभिनव भोंडवे, एल प्रो इंटरनॅशनल स्कूल. द्वितीय – महादेव मजेठिया, डी.वाय. पाटील ज्ञानशांती स्कूल. मुली प्रथम- स्वराली थोरवे, जैन इंग्लिश स्कूल, द्वितीय – खुशी राणे, आर.एम.डी इंटरनॅशनल स्कूल.
वयोगट 13 वर्षाखालील मुले प्रथम – नील गोयल, न्यू पुणे पब्लिक स्कूल, द्वितीय – विघ्नेश सुतार, सिटी प्राईड स्कूल.
मुली प्रथम-शिप्रा कदम, आर्मी पब्लिक स्कूल दिघी,द्वितीय – चंचल वाणी, सेंट उर्सुलास हायस्कूल.
वयोगट U15
मुले -प्रथम विहान, मूर्ती द अकॅडमी स्कूल, द्वितीय- वत्सल तिवारी, कमलनयन बजाज स्कूल.
मुली प्रथम – शिप्रा कदम, आर्मी पब्लिक स्कूल दिघी. द्वितीय – तनिष्का हळदनकर, सेंटर उर्सुला हायस्कूल.
वयोगट U17 मुले – प्रथम अद्वैत बारावकर, आर.के.एस.पी.एन.
द्वितीय – वेदांत पवार , डॉ.डी वाय पाटील ज्युनिअर कॉलेज.
मुली प्रथम- तनिष्का हळदनकर, सेंट उर्सुला हायस्कूल, द्वितीय – वेदिका राठोड, सेंट उर्सुला हायस्कूल या सर्व विजेत्या स्पर्धकांना ट्रॉफी , प्रमाणपत्रे, बॅडमिंटन रॅकेट आणि कीट देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धा संपन्न झाल्यानंतर सी.एम.एस विद्यालयाचे क्रीडाशिक्षक सोनाली गायकवाड, सुजाता चव्हाण, हरिहरन श्रीधर यांच्याबरोबर लाभलेल्या पंचांना सन्मानित करण्यात आले.












