पुणे दि.25 : लोहगाव परीसरात हेरॉईन व मॅफेड्रॉन (एम.डी) अंमली पदार्थची विक्री करणाऱ्या एकला अटक करण्यात आली आहे. गोपीचंद रामलाल बिश्नोई (वय 28 रा. मु. पो. पुनासा ता. भीनमाल, जि. जालोर, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे ही कारवाई (दि.२४) गुन्हे शाखेच्या, अंमली पदार्थ विरोधी पथक २ कडून करण्यात आली आहे.
विमानतळ हद्दीत पेट्रोलिंग करत असताना सदर आरोपी रामचंद्र काळे नगर लोहगाव येथे सार्वजनिक रोडवर अंमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती पोलीस शिपाई मांढरे यांना मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीकडून ४७ लाख रुपये किमतीचे ३१२ ग्रॅम 60 मि. ग्रॅम हेरॉईन व १० लाख ४७ हजार रुपये किंमतीचे ५३ ग्रॅम ८६० मि. ग्रॅम मॅफेड्रॉन अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरोधात विमानतळ पोलिस स्थानकात एन डी पी एस अॅक्ट कलम ८(क ), २१(क),२२(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक,अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सह पोलीस आयुक्त गुन्हे 2 सतीश गोवेकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंमली पदार्थ विरोधी पथक 2 सुनील थोपटे, पोलीस उपनिरीक्षक शुभांगी नरके, दिगंबर चव्हाण, योगेश मांढरे, शिवाजी घुले, प्रशांत बोमादंडी, संदीप जाधव, रवींद्र रोकडे, मयूर सूर्यवंशी,चेतन गायकवाड, संदीप शेळके, महेश साळुंखे, साहिल शेख, नितीन जगदाळे, अजीम शेख, युवराज कांबळे, दिनेश बास्टेवाड, दिशा खेवलकर यांनी केले आहे.
हेरॉईन व मॅफेड्रॉन अंमली पदार्थची विक्री करणारा पोलिसांच्या जाळ्यात












