पुणे : मुंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हॉटेल ओरीला मध्ये एन्ट्री न दिल्याच्या कारणावरून तिघांनी मिळुन वेटरला त्याच्या पाठीवर, हातावर व डोक्यात सपासप वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी पहाटे सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
धिरेंद्र अवदेश चौहान (27, रा., मुंढवा) यांनी सादर प्रकरणाची पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपी अबीद युसुफ खान (20, रा. लोहियानगर, पुणे) याला अटक केली आहे. शनिवारी पहाटे सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास फिर्यादी काम संपवुन सहकारी विक्रम उदाइन सह पायी निघाले असता
आरोपी अबीद युसुफ खान आणि त्याच्या दोन साथीदार तेथे आले व दोघांनी विक्रम उदाईन यास पकडुन ठेवले तर एकाने धिरेंद्रला ‘क्यु रे हमे एन्ट्री नही दे रहे थे, तब क्यु हस रहा था’ असे म्हणून त्याच्याकडील धारदार हत्याराने त्याच्या पाठीवार, हातावर आणि डोक्यात सपासप वार केले आणि घटनास्थळावरून पसार झाले.
मुंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे आणि त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी भेट दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप जोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्या दोन साथीदारांचा पत्ता देखील लागला आहे व त्यांची शोध मोहीम सुरु आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जोरे करत आहेत.
हॉटेलमध्ये एंट्री न दिल्याच्या कारणावरून खुनाचा प्रयत्न












