पुणे । प्रतिनिधी
पुणे, दि.१७ : पुणे शहरातील सिद्धार्थ गायकवाड आणि त्याच्या १६ साथीदारां विरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.ही घटना सहकार नगर पोलिस स्टेशन च्या हद्दीत घडली आहे.
२३/०६/२०२३ रोजी फिर्यादी हे लहुजी शक्ती सेनेच्या ऑफिस जवळ थांबले होते. तेव्हा सिद्धार्थ गायकवाड त्याच्या सर्व साथीदारांसह तेथे आला.त्याने स्वतः जवळील हत्यार हवेत फिरवली.तसेच तुमच्या दोघांना आणि तुमच्या गँगला बघून घेतो,तुम्ही सुधरा नाहीतर मर्डर करेल अशी धमकी दिली.त्याच्या सर्व साथीदारांनी परिसरातील वाहनांची तोडफोड करत नुकसान केले.
१) सिध्दार्थ विजय गायकवाड, वय २२ वर्षे रा. अण्णाभाऊ साठे वसाहत, अरण्येश्वर, पुणे (टोळी प्रमुख) २) राम राजाभाऊ उमाप, वय २३ वर्षे, रा. सदर ३) सनी ऊर्फ किरण कैलास परदेशी वय २७ वर्षे, रा. सदर ४) अमोल ऊर्फ नाना जालिंदर बनसोडे, वय ३१ वर्षे, रा. सदर ५) समीर रज्जाक शेख, वय २३ वर्षे, रा. सदर ६) राजाभाऊ ऊर्फ जटाळया लक्ष्मण उमाप वय ५० वर्षे, रा. सदर ७) गणेश ऊर्फ भुषण कैलास परदेशी, वय ३० वर्ष, रा. सदर ८) नब्बा ऊर्फ नरेश सचिन दिवटे, वय- २६ वर्षे, रा.स.नं.१३३.दांडेकर पुल पुणे ९) हर्षद आप्पा ढेरे, वय-२२ वर्षे, रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड, पुणे १० ) शुभम ऊर्फ हुई अनिल ताकतोडे, वय १९ वर्षे, रा. सदर ११) विशाल शिवाजी पाटोळे, वय १९ वर्षे, रा. सदर १२) चेतन महादेव कांबळे, वय २६ वर्षे, रा. सदर १३) गौरव अरविंद नाईकनवरे वय २२ वर्षे रा. ६४ / १२ जय हिदं नगर, अपर इंदिरानगर बिबवेवाडी पुणे (आ.क्र.१ ते १३ यांना अटक करण्यात आली असून इतर ०२ विधीसंघर्षीत बालके यांना ताब्यात घेण्यात आले आहे व इतर ०२ टोळीतील सदस्यांचा शोध सुरू आहे.
सिद्धार्थ गायकवाड याच्या टोळीवर ४ गुन्ह्याची नोंद आहे. तसेच प्रत्येकावर स्वतंत्रपणे १० गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
सर्व आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम ३९५,३२३,४५२,१४३,१४४, १४७, १४८, १४९,४२७,५०४, ५०६ आर्म ॲक्ट कलम ४ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) १३५. मपोकाक १४२ क्रिमीनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट कलम ३ व ७ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर हे करत आहेत.
सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परि- ०२, पुणे, श्रीमती स्मार्तना पाटील, मा.सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे, श्री. नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पो स्टे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुरेंद्र गजेंद्र माळाळे पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. संदिप देशमाने सव्हेलन्स पथकाचे पोलीस अंमलदार संजय गायकवाड, मंगेश खेडकर, पुजा तिडके, भाऊसाहेब आहेर यांनी केली आहे.












