पुणे प्रतिनिधी
पुणे दि १७ : शब्दरंग कला साहित्य कट्ट्या तर्फे 15 ऑगस्ट निमित्त धन्य ती बंदी शाळा या एकांकिकेचे सादरीकरण करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अंदमान वास्तव्यावर ही एकांकिका आधारित आहे.
निगडी प्राधिकरण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, निगडी नगर, देहू गटातर्फे आयोजन करण्यात आले होते. या एकांकिकेसाठी रुपीनगर येथील डॉक्टर कुंदन पाटील आणि पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष श्री राजन लाखे हे प्रमुख पाहुणे होते. कार्यक्रमाचे आयोजन साहित्य कला संघ, रूपी नगर यांनी केले, हा कार्यक्रम यशस्वी पूजा काळे, पंढरीनाथ दरेकर, अनन्या शहागडकर, गुरुकृपा संगीत क्लासेस च्या विद्यार्थ्यांनी केले.
कलाकार मा.सतिश सगदेव, चंद्रशेखर जोशी, सुभाष भंडारे, अशोक अडावदकर, आनंदराव मुळूक, युवराज गायधनी यांनी एकांकिका सादर केली. एकांकिकेचे दिग्दर्शक मा. अशोक अडावदकर,
तर संहिता लेखन ज्योती कानेटकर यांचे होते.
गीत गायन मनिषा मुळे यांनी केले. रूपी नगर येथील कार्यक्रमाचे बहारदार सूत्र संचालन सीमा गांधी यांनी केले. तर ठाकरे उद्यान येथील एकांकिकेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती कानेटकर यांनी केले. श्री आनंदराव मुळुक आणि चंद्रशेखर जोशी यांनी प्रस्तुत प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर यांना ही माहिती दिली.












