मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत. 14 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन मराठा समाजाने केले आहे. मराठा आरक्षण कायद्यासाठी बंदंच अवाहन केले जातेय.
मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात पेटला असताना सरकार विशेष अधिवेशन बोलवणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय. 16 फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन बोलवलं जाणार आहे.
16 फेब्रुवारीला एक दिवसाचे अधिवेशन बोलवले जाणार आहे. त्याआधी मंगळवार किंवा बुधवारी राज्य मंत्री मंडळाची बैठक घेऊन अहवालाला मंजुरी देण्यात येईल. तसंच, आत्तापर्यंत केलेल्या सर्वेक्षणाचे सादरीकरण करण्यात येईल, मराठा समाज माागासवर्गीय आहे. याचे पुरावे देण्यात येतील, अशी माहिती कळतेय. तसंच, अधिवेशनात मराठा मागास अहवाल मंजूरी देणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजतेय.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडे 9 मागण्या केल्या आहेत. मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सोडणार नाही असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिलाय. जरांगे उपोषणादरम्यान पाणी आणि औषधोपचार घेत नसल्यानं त्यांची प्रकृती खालावलीय अशी माहिती समोर येतेय.