आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार अमोल कोल्हेंविरोधात प्रबळ उमेदवार देऊन कोल्हेंचा पराभव करणारच, असा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलून दाखवला. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे.
” निवडणूक जवळ आली की कुणाला संघर्षयात्रा तर कुणाला पदयात्रा सुचतेय. लोकशाहीत प्रत्येकाला अशा यात्रा काढण्याचा अधिकार आहे. पण ५ वर्षे मतदारसंघात लक्ष द्यायचं होतं”, अशा शब्दात अजित पवार यांनी कोल्हेंवर टीका केली.
अजित पवार यांच्या याच सुरात सूर मिसळून कोल्हेंविरोधात लढण्याची इच्छा अजित पवार गटाचे नेते विलास लांडे यांनी बोलून दाखवली. यावेळी माध्यमांशी बोलताना विलास लांडे म्हणाले की, शिरूर लोकसभेसाठी अमोल कोल्हे यांच्याविरोधात आम्ही तगडा उमेदवार देणार असून तो उमेदवार जिंकून यावा, यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मेहनत करतील. मात्र तो उमेदवार कोण याबाबत अद्याप स्पष्टोक्ती मिळाली नसली तरी अजितदादांनी जर मला खासदारकीची संधी दिली तर मी लढेन आणि दादांचा शब्द खरा करून दाखवेन. यासाठी मी दादांशी चर्चा करणार आहे, असंही लांडे यांनी सांगितले.












