दरवर्षी २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात असून या दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात तसेच जिल्हा व तालुका स्तरावर विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयातील योजना व तक्रार निवारणाबाबत प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात नागरिकांमध्ये वस्तू व सेवा खरेदी करताना दर्जा तसेच वजनमापांमध्ये होणाऱ्या फसवणुकीपासून सावधानता बाळगण्याबाबत संदेश प्रदर्शित करण्यात आले आहेत.
ग्राहक हक्कांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी ग्राहकांच्या जबाबदाऱ्या कर्तव्ये आदींबाबत ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण होण्यासाठी संदेश व माहिती देणारे विविध शासकीय कार्यालयांची दालने प्रदर्शनात आहेत. याबाबतची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. सिमा होळकर यांनी दिली आहे.












