संभाजी ब्रिगेडची पोलीस आयुक्तांकडे तक्रार
पिंपरी: फेसबुक या समाजमाध्यमावर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे बदनामीकारक तसेच आक्षेपार्ह छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. हा जाणीवपूर्वक खोडसाळपणा करण्यात आलेला असून या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करण्याचा काही जणांचा मानस असल्याचे दिसत आहे. त्यामुळे वादग्रस्त छायाचित्र प्रसिध्द करणाऱ्या विकृत प्रवृत्तीवर कडक कारवाई करावी, तसेच सदरील फेसबुक पेजवर तात्काळ बंदी घातली जावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.
याबाबत संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतिश काळे व वैभव जाधव यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, फेसबुक या समाजमाध्यमावरील इंडिया अगैंस्ट रिझर्व्हेशन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आक्षेपार्ह मजकूर लिहिलेले,मॉर्फ केलेले छायाचित्र पोस्ट करण्यात आलेले आहेत. तसेच या पोस्टवर मोठ्या प्रमाणात अश्लिल कमेंट्स करण्यात येत आहेत. या तक्रारीची सायबर पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत वादग्रस्त छायाचित्र प्रसिध्द करणाऱ्या विकृत प्रवृत्तीवर कडक कारवाई करावी,तसेच सदरील फेसबुक पेजवर तात्काळ बंदी घातली जावी,अशी मागणी करण्यात आली आहे.












