नागपूरच्या दिघोरी नाका, उमरेड रोड येथील 40 एकरांच्या मैदानावर या महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. 103 वर्षानंतर काँग्रेसच्या स्थापना दिनाची सभा नागपुरात होत असल्यामुळे विदर्भासह देशभरातील काँग्रेस पक्षाचे नेते या महारॅली मध्ये उपस्थित राहणार आहे.
काँग्रेसच्या 139 व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात होत असलेल्या या महारॅलीला ‘है तय्यार हम’असे नाव देण्यात आले आहे. तर, ज्या मैदानात ही सभा होते आहे त्या सभा स्थळाला ‘भारत जोडो मैदान’असं नाव देण्यात आलंय.
आज दिघोरी येथे आयोजित महारॅलीला मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, इत्यादी सह काँग्रेसचे देशभरातील नेते आणि लाखो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे. लोकसभा निवडणुकीचा बिगुल फुंकण्यासाठी दीक्षाभूमी व संघभूमी असलेल्या उपराजधानीत गांधी कुटुंबीय प्रथमच एका व्यासपीठावर येणार आहे.
‘है तैयार हम’ महारॅलीमुळे महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह व आनंद आहे.या सभेची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. या सभास्थळी सकाळपासूनच कार्यकर्ते गर्दी करू लागले आहे.












