आज रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली त्यात राज्यातील राज्य सरकारकडून मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या विदेशी दौऱ्यांवर कोट्यवधी रुपयांची उधळण करण्यात येत आहे. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांकडून परीक्षेसाठी हजार रुपये परीक्षा फी घेण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ओएसडीच्या अनेक कंपन्या असून, त्यांच्या संबधित कंपन्यांना परीक्षेचे कामं मिळत आहेत. तसेच फडणवीसांच्या ओएसडीच्या एका विदेशी दौऱ्यावर 1 कोटी 88 लाखांचा खर्च झाला आहे. असा हल्लाबोल राज्य सरकारवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा आमदार रोहित पवार यांनी आयोजित पत्रकार परिषदेमधून केला आहे.
रोहित पवार म्हणाले की, 23 नोव्हेंबर 2023 ला आम्ही एमआयडीसीकडे काही माहिती मागवली होती. यामधे विदेशात कोण-कोणते प्रवास झाले आणि त्यासाठी किती खर्च झाला याची माहिती मागवण्यात आली. 32 लाख रुपये खर्च झाला. आत्तापर्यंत 42 ते 45 कोटी रुपये वेगवेगळ्या विदेशी दौऱ्यावर खर्च झाला आहे. तैवान देशात मंत्री महोदय गेले नव्हते केवळ अधिकारी तिथं गेले होते. देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी कौस्तुभ ढवसे कशासाठी गेले होते. यासाठी 1 कोटी 88 लाख रुपये खर्च झाला. इतका खर्च कसा काय झाला? तुम्ही खासगी जेटने गेला होतात का? कारण 5 लोकांवर 60 लाख रुपये कसा काय केला? असा प्रश्न रोहित पवारांनी केला आहे.
रोहित पवार म्हणाले की, सरकारने परदेशात जाऊन केवळ 50 लाखांचे एमओयू केले आहेत हे गंभीर आहे. मग हे परदेशात गेले कशाला. कौस्तुभ ढवसे यांच्या अनेक कंपन्या आहेत. असा व्यक्ती देवेंद्र फडणवीस यांचा ओएसडी झाला कसा काय? याचाच मित्र आयटी घोटाळ्याचा आरोपी आहे. ज्या कंपनीला कंत्राट दिलं होत त्याचा डायरेक्टर कौस्तुभ ढवसे आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात काम करतो. याचा अर्थ त्यांचा याच्याशी संबंध आहे. कारण देवेंद्र फडणवीस सत्तेत असताना हा व्यक्ती त्यांच्या सोबत होता. त्यानंतर सत्ता गेली की हा व्यक्ती गायप झाला आणि आता देवेंद्र फडणवीस सत्तेत आले की पुन्हा कौस्तुभ ढवसे त्यांचा ओएसडी झाला आहे.












