पुणे : ५ जानेवारीला पुण्याचा कुख्यात गुंड शरद मोहोळ याची भर दिवसा हत्या केली. या प्रकरणात अनेकांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. तसेच या हत्येच्या कटाचे मास्टरमाइंड गुंड विठ्ठल शेलार आणि मुन्ना पोळेकर हे असल्याचे पोलीसांच्या तपासत समोर आले आहे. पुणे पोलिसांनी मोहोळच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गुंड विठ्ठल शेलाराची पोलिसांनी धिंड काढल्याची प्रकार समोर आला आहे.
पुणे गुन्हे शाखेने गुंड विठ्ठल शेलार याचा दबदबा असलेल्या भागातून धिंड काढली या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये गुन्हे शाखेचे पोलीस शेलारला बेड्या घालून रस्त्यावरून घेऊन जाताना दिसत आहेत. गुंड विठ्ठल शेलार शरद मोहोळ हत्या प्रकरणी पुणे पोलिसाच्या ताब्यात आहे, शेलार वर अनेक गुन्हे दाखल आहेत.
मोहोळची भररस्त्यात हत्या केल्यानंतर पुणेकरांच्या मनात आरोपी शेलार याच्याविषयी दहशत पसरली होती. हीच दहशत कमी करण्यासाठी पोलीसांनी शेलार याची भररस्त्यावरून धिंड काढल्याचे सांगितले जात आहे.












