पुणे : अंशत ढागाळ हवामानामुळे राज्यात किमान तापमान कमी-जास्त होत आहे. पुणे व परिसरात गारठा पुन्हा वाढला असून, उत्तर महाराष्ट्र थंडीने कुडकुडला आहे. राज्यातील सर्वांत कमी किमान तापमान जाळगाव येथे नऊ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले. पुण्यात किमान तापमानाचा पारा १२.१ अंश सेल्सिअस नोंदला गेला.
उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम आहे. सोमवारी मध्य प्रदेशातील दातीया येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी २.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवे गेले. पंजाब ,हरियाना,चंडीगड,दिल्ली उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात किमान तापमान तीन ते सात अंसादरम्यान आहे.उत्तर भारतात धुके आणि थंडीची लाट कायम आहे.
उत्तर कोकण आणि परिसरातवर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. दक्षिणअंतर्गत कर्नाटकपासून विदर्भ ते छत्तीसगडपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.यामुळे राज्यात ढगाळ वातावरण तयार होत आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाला पोषक हवामान आहे. उत्तर महाराष्ट्रात हुडहूडी वाढली असून ,धुळे येथील कृषी महाविद्यालयात हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. यापूर्वी निफाड येथील गहू संशोधन केद्रात १६ जानेवारीला ६.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले होते. सोमवारी निफाड येथे ८.८ तर जळरगाव पोषक हवामान आहे. उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी वाढली असून, धुळे येथील कृषी महाविद्यालयात हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात किमान तापमानचा पारा १० ते १८ अंशांदरम्यान आहे. राज्याच्य किमान तापमानात घट होत गारठा वाढण्याची शक्यता आहे.
यापूर्वी निफाड येथील गहू संशोधन केंद्रात १६ जानेवारीला ६.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले होते. सोमवारी निफाड येथे ८.८, तर जळगाव येथे नऊ अंश तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा १० ते १८ अंशांदरम्यान आहे. राज्याच्या किमान तापमानात घट होत गारठा वाढण्याची शक्यता आहे.
सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) –
पुणे १२.१, धुळे ६.३, जळगाव ९.०, कोल्हापूर १७.१, महाबळेश्वर १३.५, नाशिक ११.६, निफाड ८.८, सांगली १७.७, सातारा १४.५, सोलापूर १७.६, सांताक्रूझ १२.६, डहाणू १६.५, रत्नागिरी १७.८, छत्रपती संभाजीनगर ११.५, नांदेड १६.६, परभणी १४.८, अकोला १२.८, अमरावती १४.३, बुलडाणा १२.४, ब्रह्मपुरी १७.१, चंद्रपूर १६, गडचिरोली १४.२, गोंदिया १२.९, नागपूर १४.४, वर्धा १५.५, वाशीम १२.४, यवतमाळ १५












