पैंटिंगच्या कामासाठी दिलेले पैशे परत मिळावे म्हणून एकाचा अपहरण करून त्याच्या पत्नी कडे ५०,००० रुपयांची मागणी पण पैशे मिळण्या पूर्वीच इसम मृत्युमुखी पडला व मृतदेहे हॉस्पिटलमध्ये सोडून पळून गेले.
भुवाल उर्फ मनोज मौर्या (वय ३८. रा. काळेवाडी, वाकड) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव असून, भुवाल यांच्या पत्नी लालमुनी भुवाल उर्फ मनोज मौर्या (वय ३२) यांनी या संदर्भात वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून वाकड पोलिसांनी शुभम दिलीप वाल्हेकर (वय २७, रा. वाल्हेकरवाडी), सागर जाधव (वय २७, रा. रहाटणी), कुणाल भरम (वय २३, रा. वाल्हेकरवाडी), सौरभ वाघमारे (वय २५, रा. वाल्हेकरवाडी), अक्षय पाटील (वय २३, रा. बिजलीनगर) व दिनेश म्हस्के (वय २७, रा. वाल्हेकरवाडी) या सहा आरोपींना अटक करून त्यांच्या विरुद्ध भा.दं.वि. कलम १४३, १४५, १४८, १४९, २०१, ३६४, ३०२ अन्वय गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार भुवाल उर्फ मनोज मौर्या हे पैंटिंगचा काम करत होते, काही दिवसंपूर्वी त्यांनी एकाचे पैंटिंगचे काम घेतले होते व त्यांचे काम पुर्ण झाले नाही म्हणुन त्यांचा फोन येत होता त्यामुळे दोन दिवसापुर्वी त्याचे काम करणार असल्याचे सांगून त्याचे सामान त्यांचे घरी टाकून आल्याचे त्यांनी त्यांच्या पत्नी लालमुनी यांना सांगितले होते. दि. २६ रोजी सकाळी ०८.३० वा. चे सुमारास “कल साईट सुरु होने वाली थी लेकिन शुरु नही हुई थी आज चालु होने वाली है” असे पत्नीला सांगून ते घरातुन निघुन गेले व त्यानंतर पत्नी कामावर असताना सकाळी ११.३० वा. चे सुमारास भुवाल यांचा मो. नं. ९६५७७५४४५२ वरुन पत्नी लालमुनी यांना कॉल आला व ते बोलला की ‘अर्जंटमध्ये ५०,०००/- रुपये पाहीजे त्यामधील संतोष (मामा) हा ३००००/- रुपये देईल व तु तुझ्या भावाकडुन २००००/- रुपये मागुन घे’ तेव्हा पत्नीने पैसे कशाला पाहीजे असे सांगुन तुम्ही कोठे आहात मी तिकडे येते व त्यानंतर मी पैशांचे बघते असे म्हणाले असता त्याने तु इकडे येवु नको पैशांसाठी तुझे भावाबरोबर बोलुन घे असे म्हणुन फोन बंद केला. त्यानंतर २ वेळा पुन्हा भुवन व लालमुनी यांचे पश्या संदर्भात बोलणे झ्हाले तिसऱ्या वेळी फोने आला तेव्हा फोनवरून भुवन व आणखी एक इसम बोलत होता त्यावेळी सदर इसमाने तो सागर बोलत असल्याचे सांगुन, ‘तुझे पती आमचे कडे आहेत ५००००/- रुपयांची लगेचच व्यवस्था करा किंवा गुगल पे करा तेव्हाच तुझे पतीला सोडण्यात येईल’ असे बोलला तेव्हा लालमुनी यांची वाहिनी त्याचेशी बोलली की तुम्ही कोण आहात, तुम्ही त्याला सोडुन दया मी पैशांची व्यवस्था करते तसेच मी त्यांना तुम्ही कोठे आहात.
मी तेथे येते कशाचे पैसे आहेत हे पाहते व त्यानंतर मी पैशांची व्यवस्था करते असे बोलले असता त्याने तुम्ही इकडे येवु नका पैशांची व्यवस्था करा त्यानंतर आम्हीच तिकडे तुमचे पतींना घेवुन येतो असे म्हणाले. भुवन व लालमुनी यांच्या ओळखीचे व बाजुला राहणारे संतोष कुमार (मामा) हे लालमुनी कामाचे ठिकाणी आले व त्यांनी सांगितले की, तुमचे पतींनी सकाळी काम असल्याचे सांगुन त्यांचेबरोबर येण्यास सांगितल्याने आम्ही मुकाई चौक येथे गेलो असता दोन कारमधुन ४ ते ५ इसम असे आले व त्यांनी त्यास शिवीगाळ करुन आमचे कामासाठी अॅडव्हान्स दिलेले पैसे आता परत दे तरच तुला सोडतो असे म्हणुन त्याला घेवुन निघुन गेले आहेत. त्यावेळी मी त्या कारचा नंबर पाहीला असता एका कारचा नंबर एमएच १४/००१२ मधील अक्षरे माहीत नाही व दुस-या कारचा नंबर पाहता आला नाही. त्यानंतर काही वेळाने त्यांनी मला भुवाल ऊर्फ मनोज याचे फोनवरुन कॉल करुन अर्जंटमध्ये ३०,०००/- रुपयांची मागणी केली असुन मी लगेच इतके पैसे कोठुन आणु असे बोलला परंतु मी काहीतरी व्यवस्था करीत आहे असे म्हणुन तो माणूस (मामा) निघुन गेला, दुपारी लालमुनी यांना भुवन च्या फोनवरुन पुन्हा फोन आला व त्यावरुन थेरगांव हॉस्पिटल येथे तुझा पती आलेला असुन तु तिकडे ये असे कुणीतरी बोलला त्यावरून हॉस्पिटलमध्ये चौकशी केल्या त्यानंतर पोलिसांनी लालमुनी यांना सीसीटीव्ही फुटेज दाखवुन ट्यान्कव्या पतीस ओळखण्यास सांगितले. त्यावेळी थेरगांव हॉस्पिटलमध्ये भुवन यांना दोन इसम एका रिक्षामधुन खाली उतरविताना दिसले. हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी भुवन याला तपासले असता तो तपासणीपुर्वी मयत झाला असल्याचे घोषित केले होते. वाकड पोलिसांनी आपली तपस चक्रे वेगात फिरवून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे.
हि कामगिरी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे सह पोलीस आयुक्त परिमंडल दोन बापू बांगर सहायक पोलीस आयुक्त वाकड विभाग विशाल हिरे यांच्या आदेशान्वये वक्रपृष्णाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जावतवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली आहे.पुढील तपास वाकड पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक अर्जुन पवार करीत आहे.












