ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी 2023 वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले आहे.
अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले, असे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करतांना म्हटले आहे.अशोक सराफ हे मराठी, हिंदी चित्रपट सृष्टीतले एक दिग्ग्ज कलाकार आहे. त्यांचे अनेक गाजलेले चित्रपट आजही लोकांच्या मनावरती राज्य करत आहे. अशोक सराफ यांनी २५० पेक्षा जास्त मराठी चित्रपटांमधी काम केला आहे. आज त्यांना वयाच्या ७६ व्या वर्षी हाराष्ट्र भूषण पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.












