मोबाईल हा प्रत्येक व्यक्तीचा जिव्हाळ्याचा विषय व मुलभूत गरज निर्माण झालेली आहे. अ- वस्व-निवारा इतकाच आज मोबाईल महत्त्वाचा समजला जातो. मोबाईलच्या माध्यमातून माणूस माणसांशी जोडला जातो, त्यामुळे प्रत्येक जणांकडे मोबाईल हा असतोच असतो. दैनंदीन काम व जीवनातही मोबाईल अत्यंत महत्वाचे साधन मानले जाते.
पिंपरी पोलीस स्टेशन हद्दीत एप्रिल महिन्यात परराज्यातून आलेले ३५ व राज्यभरातून आलेले १५ मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले. मा. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी हरवलेल्या मोबाईलकरीता विशेष मोहिम एप्रिल महिन्यात राबविली होती. हरवलेले मोबाईल लवकर वापरात येत नाहीत. त्यामुळे त्यंचे मिळण्याचे प्रमाण अत्यंत कमी असते. असे असताना कायम पाठपुरावा करून पिंपरी पोलीस स्टेशन हद्दीतून हरवलेल्या जास्तीत जास्त मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करुन शोध घेण्यात आला. बिहार, कर्नाटक, मालदा पश्चिम बंगाल, ओरीसा, राजस्थान, गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश, केरळ या भागात चालू असलेल्या स्थितीत असलेल्या मोबाईलच्या डिटेल्स प्राप्त करुन घेण्यात आल्या. प्राप्त डिटेल्सच्या आधारे पोलीस हवालदार दत्तात्रय निकम व पोलीस नाईक शहाजी धायगुडे यांनी विशेष परिश्रम घेवून पाठपुरावा केला(return losted property).
कन्नड व तेलगू या भाषा बोलणारे पोलीस नाईक धायगुडे यांनी कर्नाटक परिसरातून बहुतांशी मोबाईल युजर यांचेशी संपर्क करुन स्थानिक पोलीस प्रशासनाच्या मदतीने सदरचे मोबाईल वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पिंपरी पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड नांवाने मागवून घेण्यात आले. राजस्थान तसेच इतर हिंदी भाषिक परिसरातून मोठया प्रमाणात मोबाईल मागवून घेण्यात आले. एकुण ३५ मोबाईल परराज्यातून बोलविण्यात आले होते. तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्हयातून १५ मोबाईल मागविण्यात आले. काही मुळ मालकांनी स्वतःचे नंबर बंद करुन ठेवण्यात आल्याने त्यांची माहिती घेवून त्यांना निरोप देवून सदरचे मोबाईल मा.विवेक पाटील, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-१, पिंपरी-चिंचवड, मा. प्रेरणा कट्टे, सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी विभाग, पिंपरी-चिंचवड व राम राजमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पिंपरी पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड यांचे हस्ते परत करण्यात आले. उपस्थित नागरीक श्री जगजीतसिंग प्रतापसिंग बेदी, भगवान दिगंबर दुधाळ, वैष्णवी पाटील, श्रीजीत राधाकृष्णन, सचिन सनेर यांनी मनोगत व्यक्त करुन पोलीसांचे मनःपूर्वक धन्यवाद मानले.
मा. विवेक पाटील, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-१, पिंपरी-चिंचवड, मा. प्रेरणा कट्टे, सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी विभाग, पिंपरी-चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिंपरी पोलीस स्टेशन यांनी व मोबाईल मिसींग पथकाचे पो.हवा. दत्तात्रय निकम, पो.ना. शहाजी धायगुडे व म.पो.ना. भाग्यश्री जमदाडे यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.
७ लाख किमतीचे हरवलेले मोबाईल मूळ मालकांना परत(return losted property)












