प्रसार माध्यमांन मध्ये आज एकच चर्चा सुरु होती पश्चिम महाराष्ट्रातील शरद पवार गटातील बडा नेता भाजपच्या वाटेवर आहे. तसंच हे नाव दुसऱ्या तिसऱ्या कुणाचं नसून जयंत पाटील यांचं आहे.जयंत पाटील यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा आज सकाळपासून रंगली आहे. या सगळ्या चर्चांवर दस्तुरखुद्द जयंत पाटील यांनी मौन सोडलं आहे.
लोकसभा निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते अशी स्थिती आहे. या निवडणुकीच्या तोंडावर देशपातळीवर भाजपात आणि एनडीएत इनकमिंग वाढलं आहे. तर महाराष्ट्रात महायुतीमध्ये लोक मोठ्या प्रमाणावर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच अशोक चव्हाण यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला. मिलिंद देवरा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेले तर बाबा सिद्दीकी हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर गेले. काँग्रेसचे दिग्गज समजले जाणारे हे नेते महायुतीत गेले. आता आज सकाळपासूनच जयंत पाटील भाजपात जाणार असल्याची चर्चा आहे. यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही वक्तव्य केलं आहे.
काही कुठे येणार नाही आणि जाणार नाही. माझ्या नावाची चर्चा असेल तर चांगलंच आहे. प्रसिद्धी मिळाली की लोकांसमोर जाता येतं. या सगळ्या चर्चानंतर खुद्द
जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या चर्चा थांबवल्या मी कुठे ही चालो नाही. मला भाजपच्या कुठल्याही नेत्याकडून कुठली ही ऑफर आली नाही.
गेल्या वर्षी मे महिन्यात जेव्हा शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिली तेव्हा जयंत पाटील रडले होते. शरद पवारांचे अत्यंत निष्ठावान आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांचा विषय त्यांनी आता स्पष्ट केले आहे. आणि या सगळ्या चर्चा अफवा आहे असं देखील ते म्हणाले आहे.












