पुणे : मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्राला वेड्यात काढलं आहे जरांगे यांच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात आहे. आसा आरोप संगीता वानखेडेंनी यांनी केला. आहे वानखेडे या मनोज जरांगे यांच्यासह मराठा आंदोलनात कार्यरत होत्या. मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर फारकत घेतल्यानंतर संगीता वानखेडेंनी त्यांच्यावर टीका केली आहे.आणि आरोप केला आहे.
बारसकर महाराज यांनी जे सांगितलं तेच बरोबर आहे. जरांगे पाटील कुणालाच विश्वासात घेत नव्हते . एक फोन यायाचा आणि मंग ते पुढची दिशा ठरवाचे तो फोन शरद पवारांचाच असणार दुसरं कोण असणार शरद पवार त्यांच्यामागे आहेत.आंदोलनाचा सगळा खर्च शरद पवारांनी केला आहे. कालांतराने हे सत्य बाहेर येईल असंही संगीता वानखेडे यांनी म्हटलं आहे. माझं तोंड कुणी बंद करू शकणार नाही. बारसकर यांच्याकडे पुरावा आहे. मनोज जरांगे काल काय म्हणाले. तर एक दोनच आहेत आजून बाहेर येतील असं म्हणाले होते लोक आता बाहेर येतील.यांची मतं पटलेली नाही आणि लोक फुटलेत. त्यामुळे लोक बाहेर येणार आहेत. असंही वानखेडे म्हणाल्या












