माजी राज्यमंत्री बाळ भेगडे यांच्या प्रयत्नातून त्याचप्रमाणे सोमाटणे गावच्या विद्यमान सदस्य पूजा मुऱ्हे यांच्या प्रयत्नांतून सोमाटणे गावाचे विकास कामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ७० लक्ष रुपयांच्या निधी उपलब्ध करण्यात आला आहे.
सदर निधीमधून परंदवाडी रस्ता ते टाटा सोसायटी ते ड्रीम होम्स सोसायटी पर्यंतचा रस्ता व सोमाटणे गावातील विविध विकास कामे होणार आहेत. नुकताच या सर्व कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडला. मा. राज्यमंत्री बाळा भेगडे, मावळ भाजपाचे निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य काळुराम नढे यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकांकडून करण्यात आले. यावेळी गावातील आजी माझी सरपंच, उपसरपंच, सदस्य व सर्व ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते












