राज्यात मराठा समाज आता आक्रमक झाला आहे येणाऱ्या काळात लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक गावात दोन उमेदवार देण्याचा निर्णय नुकताचा घेण्यात आला आहे. हा निर्णय मानवत येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे या मागणीसाठी मराठा समाज हा आता आक्रमक झालाय. आरक्षणासाठी मराठा समाजाने अनेक वर्षापासून लढा उभारला आहे. हा लढा आता मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गर्शनाखाली अधिकच तीव्र झालाय
सरकारने मराठा समाजाला न्याय देऊ समाजाचे प्रश्र सोडविण्याचे आश्वासन वारंवार दिले होते. पण त्याची पूर्तता केली नाही. यामुळे मराठा समाजाची दिशाभूल झाल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत सरकारला धडा शिकवण्यासाठी प्रत्येक गावत किमान दोन उमेदवार देण्याचा निर्णय रविवारी परभणी जिल्ह्यातील मानवतमध्ये झालेल्या सकल सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.












