पिंपरी : कार्यक्रमाची सुरूवात माता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच कार्यक्रमांचे अध्यक्ष व प्रमुख उपस्थिती यांचे हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. प्रत्येक महिलांना भारतीय संविधानाने समान हक्क व अधिकार बहाल केले आहेत, कुठलाही भेदभाव न करता तसेच उच्च व नीच्च असमानता न पाहता प्रत्येक स्त्री ही पुरुषाचा खांद्याला खांदा लावून वावरताना दिसते. महिलांचा आदर, प्रेम, सन्मान करणे ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. हिराबाई गोवर्धन घुले (मा. उपमहापौर पि. चि. म. न. पा), प्रमुख उपस्थिती सिने अभिनेत्री कल्पना भावसार, प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे, ॲड. रंजना भोसले (मा. नगर अध्यक्षा न. प ) व सौ. सुहिता आनंदा ओव्हाळ (महिला व बालविकास अधिकारी म. राज्य) , सौ. सुवर्णा सुरेश नढे ( उपाध्यक्षा ज्ञानेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळ) यांनी महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन महिलांचा आदरपूर्वक सन्मान चिन्ह व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास राजकीय, वकिली, पत्रकारिता, सामाजिक, शैक्षणिक विविध क्षेत्रातील महिलांचा या मंचावर सत्कार व सन्मान करण्यात आला. यावेळी विविध मनोरंजन, संस्कृतिक कार्यक्रम तसेच बालकलाकार ग्रूपचे कराटे प्रशिक्षण शोचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आलेले. वकिली क्षेत्रातील महिला मान्यवर ॲड. तारा नायर, ॲड. जयश्री कुटे,ॲड. अल्पना रायते, ॲड. मनीषा महाजन, ॲड. वर्षा भोसले व ॲड. पदमावती पाटील, ॲड.मंदाकिनी कुंभार, ॲड. ममता कांबळे,ॲड. अनुराधा खंडागळे, ॲड. संकल्पा वाघमारे, ॲड. धनश्री सोनवणे, ॲड. सुषमा नामदास, ॲड. गौरी म्हस्के, ॲड. तोडकर तोडकर, ॲड. पूनम शर्मा,ॲड. उषा खर्चे,ॲड. काजल वायकर,ॲड. सारिका रणदिवे, ॲड. स्नेहा कांबळे,ॲड. अभिलाषा गोलांडे, ॲड. सुनीता पाटील,ॲड.प्रमिला आव्हाड, शुभांगी पौळ, पल्ववी कुऱ्हाडे, शितल कुंभार, सायली रानवडे (लिपिक पुणे जिल्हा न्यायालय), पोलीस कॉन्स्टेबल रेश्मा गायकर, कल्पना दोडकर,ॲड. सुरेखा सय्यद ॲड.अंजली सावंत, ॲड.प्रियंका सुरवसे, ॲड. स्वाती पावडे, ॲड.प्रिया धावडे इ.उपस्थित होत्या.
त्याप्रसंगी पुरुष मान्यवर मा. अध्यक्ष ॲड. नारायण रसाळ, ॲड. सुनील कडुस्कर ॲड. अरुण खरात, ॲड. बी. के कांबळे, ॲड. नारायण थोरात ॲड. प्रतीक जगताप, ॲड. पांडुरंग शिनगारे, ॲड. निलेश कामठे, ॲड. सूर्यकांत लबडे, ॲड. मुकुंद ओव्हाळ, ॲड. अशोक खर्चे, ॲड. सागर अडागळे, ॲड. गोरख मकासारे, ॲड. रमाकांत कुंभार, ॲड. के.एम. घोगरे, ॲड. प्रशांत बचुटे, ॲड. रोहित भोसले, ॲड. अक्षय बने महिला व पुरूष वकील वर्ग मोठया संख्येन उपस्थीत
होते.
तसेच या वेळी पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशनच्या अध्यक्षा ॲड. प्रमिला गाडे, उपाध्यक्ष ॲड. गोरख कुंभार, महिला सचिव ॲड. वर्षा तिडके, सहसचिव श्रीराम गालफाडे, ॲड. विशाल पौळ, ॲड. तेजस चवरे, ॲड.जयेश वाघचौरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. संगिता कुशलकर व ॲड. गोरख कुंभार यांनी केले तर आभार प्रदर्शन ॲड. वर्षा तिडके यांनी केले.












